पेईंग गेस्ट #२
पेईंग गेस्ट – #२ ....
तशी मुंबई मध्ये सुरवात चांगली झालीच होती
पण म्हणतात ना कायम असं काहीचं नसत...मुंबई ही सतत बदलत असते त्याचप्रमाणे
माझ्या राहण्याच्याही जागा बदलत होत्या.पहिलं घर मला सोडावं लागलं त्याला कारणं अनेक होती काही माझी आणि काही
काकुंची...एक दिवस आरामात भविष्याचा विचार करत असताना दारावर काकूंनी टकटक केलं
आणि म्हणाल्या ‘शामल...मी pg बंद करतेय ...तू दुसरे घर शोधायला सुरवात कर
...झालं..!!!!’ पार पुढच्या भविष्याच्या विचार करता करता येणाऱ्या सात दिवसातल्या
भविष्याचा विचार करू लागले...पुन्हा तेच इकडे-तिकडे पळा , एजंट ना कॉल करा, परत
त्यांच्यासोबत वेगळ फिरा असं आणि तसं पण कितीही काहीही म्हटल तरी सात दिवसांत घर
शोधणं भाग होत. एका साईट वरून भक्ती शर्मा या एजंटचा नंबर मिळाला. तिने पण
सांताक्रूझ ते अंधेरी सगळीकडे फिरवलं पण एकही घर पसंत पडेना. शेवटी “आता एकच आहे,बघा
आवडत का?” असं शेवटी कंटाळून ती बोलली...मीपण
म्हटल एवढी शोधाशोध सुरु आहेच तर शेवटच पण बघून घेऊ . ठिकाण विले-पार्ले अगदी
स्टेशनच्या शेजारी. एका ख्रिश्चन स्ट्रीट मध्ये. घर अगदी लहान होत आणि त्या घरात
एक मुलगी राहत होती . माहित नाही का... पण ते घर मला बघताच क्षणी आवडलं. रेंट विचारल
आणि चक्क ती पाच हजार म्हंटली...आनंद तर खूप होता (कारण आधीच्या घरात फक्त बेड आणि
कपाट वापरून सहा हजार देत होते) आणि जराही आडेवेढे न घेता ‘मी तयार आहे इथे
राहायला!’ असं म्हणून मोकळी झाले. लगेच घेतलेला निर्णय ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे
हावभाव खर तर बघण्यासारखे होते.
आणि त्या घरात सुरु झाली माझी खरी सुरवात. ‘ख्रिश्चन
स्ट्रीट’ म्हणजे सगळेच ख्रिश्चन बांधव एकत्र राहणारे . त्या भागात गेल्यामुळे ही
कम्युनिटी मला नव्याने कळली. जवळून ती माणसं अनुभवली. नेहमी आनंदी, कामाला तर सगळेच
जायचे पण कामाचं प्रेशर कामाच्या ठिकाणी तिथेच ठेऊन आपल्या घरी आपली बायका,मुले,आई,वडील
हे आतुरतेने वाट बघत असतील ही जाणीव ठेऊन नेहमी हसत खेळत घरी येत असलेली मी पहिली
आहेत. जगण्याचा खरा आनंद काय असतो हे स्वतःला आणि समोरच्याला ते स्वतः तत्त्वज्ञान
देण्यापेक्षा कृतीतूनच ते दाखवत असत. रोज संध्याकाळी सुवासिक धूप लावून देवासमोर
उभ राहून प्रेयर करणं तेही मनापासून हे सर्वच माझ्यासाठी आल्हाददायक होतं . शनिवार
आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्याने ते दोन दिवस आनंदाची एक वेगळीच पर्वणी तिथे
बघायला मिळत असे. एक सकारात्मकता मी त्या भागात अनुभवली होती. माझी पार्टनर तिचं नाव
सिल्की . ती देखील प्रचंड उत्साही होती . आम्ही तब्बल अडीच वर्ष एकत्र होतो.
रूममेटपेक्षाही माझ्यासाठी माझी बहिण जास्त झाली होती. अनेक सुख-दुःख आम्ही
एकमेकींना सांगायचो.प्रसंग कोणताही असो ती माझ्यसोबत कायम उभी होती. हा कधी कधी
भांडण व्हायची कारण एकच ‘ माझे गळालेले केस’...बास्स ..हे सोडल्यास आमच्यात वाद
झाल्याचं मलातरी आठवत नाही पण पुन्हा मुंबई बदलत असतेच तसाच एक क्षण पुन्हा आला ते
म्हणजे आमच्या घरी झालेली चोरी....
मार्च
महिना नुकताच सुरु झालेला. आणि माझा जॉब सुरु होऊन अवघा एक महिना आणि माझा पहिला
पगार माझ्या हातात होता. एके रात्री कामावरून यायला उशीर झाला आणि नेमकी माझी सिल्की
पण तिच्या घरी म्हणजे नाशिकला गेली होती. नेमका तोच मुहूर्त पकडून साधारण रात्री
साडेतीनच्या सुमारास दोन चोर चेहरा बांधून आत घरात शिरले. कसे ते मला माहित नाही
कारण मी गाढ झोपेत होते त्यात एकटी. झोपेतून थोडी जागी झाले पण धुरकट धुरकट सगळं.
उठले घर सगळं अस्ताव्यस्त कपाट, बॅग सगळ्या उपसलेल्या जाग आली तेव्हा पण त्यांच
सामान उपसणे सुरूच होते मी ओरडले ते पळून जाऊ लागले पण थोडं पुढे होऊन घाबरूनच
पकडण्याचा प्रयत्न देखील केला आणि शूरवीर होण्याच्या नादात मार देखील खाल्ला आणि
शेवटी रामपुरी दाखवून निघून गेले... आयुष्यातला पहिला भयंकर अनुभव होता तो. सगळं
घेऊन पसार झाले होते अगदी माझा पहिला पगार आणि घरच्यांनी नवीन नोकरी लागली म्हणून
लाडाने घेऊन दिलेला मोबाइल देखील. पण यात एका गोष्टीवर हसायला आलं ते म्हणजे फ्रीजमध्ये
असलेली चॉकलेट आणि कोल्ड्रिंक पण सोडली नाहीत...मी घाबरलेले होतेच पण माझ्यापेक्षा
माझ्या आणि सिल्कीच्या घरचे जास्त घाबरले होते. त्यामुळे पुन्हा एकदा घरच्यांनी
नवीन घर शोध चांगल्या जागी असे फर्मान सोडले काही हितचिंतकांनी तर मुंबई सोड असाही
मोलाचा सल्ला दिला..पण मला मोलाचे सल्ले आवडत नाहीत...मग काय लागले पुन्हा एकदा
त्याच कामाला....
पण चोरीनंतर एक गोष्ट मी शिकले कि मी खंबीर
राहू शकते आणि परिस्थिती कोणतीही आली तरी धैर्याने सामोरी जाऊ शकते हा विश्वास
माझ्या मनात निर्माण झाला होता...या सगळ्या घडलेल्या गोष्टींचा विचार करताना एक
गाण मात्र नेहमी माझ्या ओठांवर असत...
“ए दिल है मुश्कील जीना यहा,
जरा हटके,जरा बचके ये है मुंबई मेरी जान”...


Great lines
ReplyDeleteThank u 😊
DeleteAwesome ✍️😇 Keep it up dear✌️🤗🤟
ReplyDeletethank u
DeleteKhup chan. Asach lihit ja. Best luck. I'm with u.
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteNext story chi waat pahin
Khupach mast, khup garv vattoy tuza lihina vachun. Ashich pragati karat raha 😘
ReplyDelete- Tuzi Silkey