तिचा पार्टनर


 तिचा 'पार्टनर'

मुंबई सारख्या ठिकाणी ती शिकायला गेली होती ते शिक्षण आणि सुटका या तत्त्वावर...2 वर्ष तिने शिक्षण घेतलं.एक वर्ष तिने जॉब पण केला...पण शिक्षण झालं आणि ज्या सुटकेच्या प्रयत्नात ती होती तो आनंद फक्त तीन वर्षे साजरा करता आला...पुन्हा ती पुन्हा त्याच ठिकाणी आली...आता करायचं काय....??असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला पण तिच्या वडिलांकडे तोही मार्ग होताच...काय तर इथे राहून काम कर...नाईलाजाने तिने काम करायला सुरुवात केली पण तिचं मन तिथे रमतच नव्हतं...याच कारण तिला ते येत नव्हतं अस नाही पण तिला तिच्या कलेने काम करायचं होतं... शेवटी नाईलाजच काम तिने बंद केलं...आणि नाचत नाचत तिच्या आयुष्यात आला कोरोना...त्याने तिचे अगदी सहा महिने वाया गेले...घर एके घर...घरातल्या माणसांची उट-बस...बर नुसतं घरी राहून काय करते तर फक्त स्वतःला कोसते.... ना मित्र-मैत्रिणींशी बोलणं , ना घरच्यांसोबत व्यवस्थित संवाद या सगळ्यामुळे ती एकटी पडली..घरी बसून बसून बेढब झाली...विचित्र दिसू लागली आणि त्यातच ती स्वतःचा जास्त राग करू लागली ....पण .....
हेही दिवस जातील....हे तत्त्व तिला लागू पडलं... तिचा एक बालमित्र तिच्या संपर्कात आला...सुरवातीला अगदी बोलणं नाहीच...पण हळू हळू जुनी मैत्री पुन्हा बहरू लागली...बोलणं व्हायचं कारण काही खास नव्हतं पण ती ज्या बेढब दिसण्याचा तिरस्कार करत होती तेच कारण पुढे त्यांची मैत्री वाढण्याचे निमित्त झाले...ते म्हणजे Morning walk .मैत्री हे इतकं सुंदर नातं आहे की त्यामध्ये दिसण्याचा , शिक्षणाचा आणि सौंदर्याचा विचार अजिबात केला जात नाही ...ते त्या दोघांमध्ये निर्माण झालं होतं...निखळ मैत्री...आजूबाजूने जाणारी लोकं काहीही म्हणो त्या दोघांना त्याचा फरक नाही पडला ... 'जशी दृष्टी तशी सृष्टी..' अस म्हणायचे आणि पुढे आपलं चालणं सुरू ठेवायचे...पण या सगळ्यात ती खुश होती कारण रोज सकाळी खळखळून हसू शकेल असा हक्काचा मित्र तिला भेटला होता...👫

Comments

Popular Posts