मुक्त ती ...


मुक्त ती ...
आज परी खूप खुश होती....तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आणि उत्साह दिसून येत होता...स्वतःला ताजेतवाने असे तिने स्वतःला तब्बल तीन वर्षांनी पाहत होती. सुख सुख जे ती म्हणत होती कदाचित तेच तिला सापडलं होत. हा पण इतरांच्या भाषेत तिचे सुखम्हणजे बाहेर उंडारणे , दारू पिणे आणि नाईट आउट मारणे असे होते.पण खऱ्या सुखाचा अर्थ हा फक्त तिलाच समजत होता. आज मात्र ती चेह्र्यानेच नाही तर स्वभावाने देखील पूर्ण बदलून गेली होती.सुरवातीला घाबरून घाबरून राहणारी ती आज आत्मविश्वासाने सर्वांच्या समवेत वावरत होती. कामाचे जे क्षेत्र तिने निवडले होते त्या क्षेत्रात हे असे राहणे खर तर तिला आधीपासून राहायला जमायला हवे होते पण असो ..दर आये दुरुस्त आये....पण हे वाक्य बोलताना तिला स्वतःवरच अनेक वेळा हसायला येत. याच कारण म्हणजे हे ती वाक्य दरवेळा बोलायची आणि सारख्या त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करायची. पण या वेळी मात्र तिने मनाशी पक्का ठरवलं होत चुकायच नाही ...पण मनुष्य स्वभाव तो चुकणारच...आणि चुका कारण तिचा तर जन्म सिद्ध हक्क आणि तो खाता-पिता , उठता - बसता मिळवणारच होती...त्यासाठी तिला एक अजून म्हण लागू होते ती म्हणजे गाढवासमोर  वाचली गीता आणि गाढव पण तिच्यापेक्षा शहाणा होता....असो..
        हा सर्व वृत्तांत कोणत्याही शाहण्या माणसासाठी वायफळ बडबडचं ठरेल पण तेच शब्द तिला तिचे जुने दिवस आठवून देतात आणि झालेल्या चुका पुन्हा न करण्याचं बळही... आज ती शिक्षणासाठी नाही तर स्वतःच्या पायावर उभी  राहण्यासाठी त्यापेक्षा पण स्वतःला स्वतःच्या नजरेत  सिद्ध करण्यासाठी घरातून बाहेर पडलेली आहे. हा प्रवास तिच्यासाठी नक्कीच सोपा नसणार आहे .याच कारण म्हणजे पावलो पावली तिचा भूतकाळ तिच्या समोर उभा राहणार आहे. तिच्या या प्रवासात तिचे माणसांपेक्षा पण मोठे शत्रू तिच्या सोबत असणार आहेत ते म्हणजे न्यूनगंड आणि आळस.न्यूनगंड तिच्या शरीराचा आणि आळस तिचा स्वतःचा. 
      तिने आता दोन्हीही झटकून जर काम केल तर तिला जिंकण्यापासून ती स्वतः स्वतःला थांबू शकत नाही  हे तिला माहित आहे पण अंगात मस्ती आणि किडे हा माणसाचा आजकाल दुसरा गुणधर्म ..आता लोक म्हणतायत न कि बाई ग  तू जाडी नाहीस...आहेस तशीचं छान आहेस तर बाई  ठेव ना  विश्वास ....त्यात पण या पोरीला शंका काढायची घाणेरडी सवय आणि मग बसते फुगलेले गाल अजून फुगवून आणि म्हणते शी बाबा किती जाडी आहे मी...आता साक्षात परमेश्वर जरी आला तरी या पोरीच जाडपण आणि बारीकपण नाही सांगू शाकत आणि दुसरा गुणधर्म म्हणजे किडा तो वळवळतो म्हणजे बाकी सगळ्यात पुढे पण काम करायची  वेळ कि आली झाली पोरीची टंगळमंगळ सुरु मग बॉस ने सांगितल कि १० न्यूज दे तरी पण ही ३ किंवा ४ चं देणार ..एवढा आळस केल्यावर वाटत पण कि शी बाई  किती हा आळशीपणा ..पण वाटण हे फक्त वाटण चं असत...तशातली हिची गत....पण तिने मनाशी ठरवलंय कि काहीतरी करायचच आणि ती ते करणार हेपण नक्की...
    कारण आता ती स्वच्छंद आहे..मुक्त आहे...आणि तिला कोणाची भीती नाही सर्वात महत्वाची म्हणजे तिला स्वतःची भीती नाही तिला फक्त मोकळ्या आकाशात झेप घ्यायचीय आणि स्वतःच अस्तित्व तिला हरवलेल्या गर्दीमध्ये शोधायचंय ...तिला साथ फक्त तिच्या आत्मविश्वासाची हवीय...

Comments

Popular Posts