पेईंग गेस्ट- सुरवात
पेईंग गेस्ट – सुरवात
ना भूतो न भविष्यति ! अस काहीस माझ्या बाबतीत घडलं आणि 2016 ला लेमन पार्ले . सुरवातीचे राहण्याचे ठिकाण पपी ताईच घर पनवेलला. हे खर तर तिथे गेल्यावर समजलं कि एक हे टोक आणि ते टोक . म्हणजे साध सरळ सांगायचं झालं तर चिपळूण ते दापोली प्रवास. पण ट्रेनने प्रवास म्हणजे मी तर खूषच. कॉलेज सुरु होणार होत. सकाळी ८ चा कॉलेज टायमिंग होता. आणि २ तास प्रवास म्हणून मला सकाळी पाच वाजताच उठाव लागत असे. थोडे दिवस असाही प्रवास केला पण नंतर नाही जमायचं कारण दिवस पावसाळ्याचे होते आता पावसाळ्यात मुंबई कशी असते हे मी वेगळ सांगायची गरज नाही. ३०० किलोमीटर लांब राहणाऱ्या आई ला पण माझी दया आली म्हणाली कॉलेजच्या आसपास बघ कुठे राहण्याची सोय होतेय का ते ...? आता मातोश्रीं चे आदेश तर पाळायलाच हवेत त्या प्रमाणे मी घराच्या च्या शोधात लागले. मुलींसाठी बाहेरच्या शहरात पैसे देऊन राहण्याची सोय त्यालाच “पेईंग गेस्ट” असं म्हणतात असं मला त्या वेळी पहिल्यांदा समजलं. मला काहीच माहित नव्हत त्यावेळी मुंबई चं . म्हणून मी माझ्या डिपार्टमेंटच्या मॅडम न विचारलं .त्याचं नाव पल्लवी मॅम. खूप छान आणि मनमिळाऊ होत्या त्या . त्यांना लाडाने तेथील विद्यार्थी पल्लू मॅम असं म्हणायचे. मी त्यांना सांगितलं कि मी इथे नवीन आहे आणि राहण्यासाठी जागा शोधतेय त्यांनी लगेच एका मुलीशी भेट घालून दिली ती पण राहण्यासाठी घर शोधत होती मानसी नाव तिचं .मानसी क्षीरसागर .खर तर मानसी माझी मुंबई मधली पहिली मैत्रीण. आही दोघींनी एकमेकींचे नंबर घेतले आणि आमचा घर शोधण्याचा कार्यक्रम सुरु झाला. सांताक्रूझ ते कांदिवली पर्यंत सर्व ठिकाणी घर पहिली . काही छान होती ,काही अगदीच अडगळ असल्यासारखी .खर तर कोकणातील प्रशस्त घरात राहिल्यानंतर मुंबईच्या घरांमध्ये तेपण फक्त आपल्याला बेड आणि कपाटचं पैसे भरून हक्काचं मिळणं म्हणजे चाऱ्याण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला वाटतो. पण....आता मुंबईमध्ये आलो त्यामुळे हे तर सहन करावच लागेल असं म्हणून मनाची समजूत घातली.
गोरेगाव मध्ये घर बघत असताना साक्षात
खंडेराया माझ्यासमोर आले जिम ला जात होते ते. कलाकारांना फक्त टीव्हीवर बघण्याची सवय
असल्याने हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता . आनंद होऊन मानसी ला म्हटल कि इथेच बघूया
ना घर ...आम्ही त्या सोसायटीमध्ये गेलो एक घर आवडलं... परवडण्यासारख होत पण जेव्हा
बाल्कनीमधून मागचा परिसर बघितला खर सांगू तर धडकी भरली. कारण मागे होते ‘आरेचे
जंगल’ ......बस्स ...नको मानसी इथे नको...( खूप किस्से ऐकून होते.) चला गोरेगाव
झालं...! दिवस काय सत्कारणी लागला नाही. दुसरा दिवस उजाडला . नक्की कुठे बघायचं ते
काही सुचेना. मग आम्ही लोकमान्य स्मारकात गेलो तिथे अशा जवळपासच्या पेईंग गेस्ट
च्या जाहिराती लावलेल्या असतात. त्यातील एका नंबर वर कॉन्टॅक्ट झाला आणि त्या
काकूंना मानसी आणि मी भेटायला गेलो. भात्लो बोलण झालं. किती रुपये तेही ठरलं माहे
६००० रुपये लागतील असं जेव्हा ऐकल तेव्हा धडकीच भरली .म्हंटली एका बेड आणि एक कपाट
वापरण्यासाठी ६००० द्यायचे ...? तेव्हा मानसी हळूच म्हणाली शांत रहा इथे एवढेच
असतात. मग मी शांत झाले . आणि म्हटल मला तर लागेच शिफ्ट करायचं आहे पण मानसी म्हणाली
मला एवढ्यात गरज नाही म्हंटल ठीक आहे. माझी राहण्याची सोय झाली . त्या काकू चांगल्या
होत्या. डॉक्टर होत्या. वय झालं होत. त्यांच्या बोलण्यातून असं वाटायचं कि त्यांना
पैशाची नाही तर कोणीतरी सोबत असण्याची गरज आहे. ही सोबतीची गरज पूर्ण करण्यासाठी
त्या मुलींना पेईंग गेस्ट म्हणून ठेवायच्या. (मुंबई मध्ये आजही अनेक ठिकाणी
पैशासाठी नाही तर सोबतीसाठी पेईंग गेस्ट ठेले जातातयाचं कारण म्हणजे पैसा असतो पण
गरजेला माणूस नसतो ) . त्याच वेळी मला तिथे अजून दोन मैत्रिणी मिळाल्या . दर्शना आणि गौरी gauri kavimandan दोघीही माझ्यापेक्षा लहान पण खूप गोड आणि मनमिळाऊ होत्या.
मनातल्या मनात ठरवलं कि खूप मजा करायची यांच्यासोबत पण नंतर कळल कि त्या दोन
दिवसातच सोडून जाणार आहेत म्हणून . तेव्हा समजलं कि शेवटपर्यंत असं काहीच आपलं नसत
....त्या गेल्या पण लगेच दुसरी एक मुलगी आली रक्षा म्हणून . इव्हेंट डिजाईन
करायची. तेव्हाचं तिच्याकडून मुंबईची फॅशन (एकूणच पेहराव,देहबोली आणि महत्त्वाचा
म्हणजे स्वाभिमान ) काय असते ते समजलं . आणि हो मला मेकपच्या सामानाची ओळख रक्षानेच
करून दिली होती. आणि जे काय मेकअप साठी लागत ते तिनेच मला घेऊन दिलं. हळूहळू मी
रुळले मुंबई मध्ये . म्हटल चला आता इथून पुढे कॉलेज होईपर्यंत इथेच मस्त निवांत
राहायचं ....पण....ही मुंबई आहे ...सतत बदलत असते..माझी रूम तरी एक कशी राहील
ना.... आणि अशा प्रकारे झाली माझी पेईंग गेस्ट म्हणू मुंबई मध्ये नवीन सुरवात
.....


Khup khup mast. .waiting for next blog
ReplyDeleteThank u 😊
Delete