घरचे ,लग्न आणि माझी सत्ताविशी...
घरचे ,लग्न आणि माझी सत्ताविशी...
(विषय
वाचून किती घाई झालीय हिला लग्नाची असचं डोक्यात आलं. तुळशीच लग्न झालं कि
उरलेल्या मुलामुलींची लग्न हा ट्रेंड सोशल मिडीयावर आणि आणि माझ्या घरी चालू होतो
म्हणून हे...)
‘मग
काय मॅडम, किती वर्ष पूर्ण झाली तुम्हाला ?’ या सुरातच बाबांनी फोनवरून माझी चौकशी
सुरु केली . समजून गेले कि नक्कीचं आता हे माझ्या आयुष्यातल्या सर्वात आवडत्या विषयाला
(हा विषय आवडता तीन ते चार वर्षापूर्वी होता ) हात घालणार आणि झालंही तसच... आमची
गाडी सुरु झाली ती थांबली तब्बल दोन तासांनी. हुश्श!!! निष्पन्न तसे काहीच नाही झाले
पण घरच्यांना समाधान मिळाले आणि मलाही. विषय एवढ्यावरच थांबला कि तूपण शोध आणि
आम्हीपण शोधतो. खर सांगू तर मनापासून लाज वाटली . एवढ्या वर्षात मी लग्नासाठी
मुलगा नाही शोधू शकले मग म्हंटल ‘मरूदे, आहे तशी सुखी आहे’ पण कानामध्ये
पप्पांच्या “तुझी तिशी जवळ आली” हे स्वर आनंदाने नाद करू लागले आणि वाढलेल्या
वजनाची आणि त्याचसोबत वाढलेल्या वयाची काळजी वाटू लागली. असो. नेहमीप्रमाणे म्हटले
जाऊदे उशिरा मिळेल पण चांगले मिळेल. पण खर तर तसं नसत. लवकर मिळालेलेही चांगले
मिळते पण स्वतःला समजवण्यासाठी मी अजून काही सिद्धांत नाही मांडू शकत.
तस
बघायला गेल तर वडिलधारे आणि माझे वडीलही
बोलतात कि बाई ग लग्न वेळेत कर पुढे सगळ व्यवस्थित होत (अरे हो पण त्यसाठी
मुलगा पण हवा न). आता वेळेत लग्न म्हणजे नक्की काय तर, पंचविशी मध्ये लग्न आणि
पुढचं सगळ व्यवस्थित म्हणजे तिशीच्या आता मुलं हेच असत हे मला हळू हळू समजू लागलं.
एका बाजूने विचार केला तर ते बरोबर देखील आणि पण दुसऱ्या बाजूने विचार करताना
मुलीच्या अथवा मुलाच्या सध्याच्या स्पर्धात्मक युगात पंचविशी-तिशीचा खेळ नाही चालू
शकत.कोणीतरी यशस्वी आहे तर कोणी अयशस्वी आहे.
मुलीने
स्वतःच्या पायावर उभे राहून लग्न केले पाहिजे का? हा प्रश्न जेव्हा उभा राहतो
तेव्हा आपसूकच सर्वांच्या तोंडून ‘म्हणजे काय, असलेच पाहिजे!!!’ असे येतेच. पण
किती ठिकाणी स्वतःच्या पायावर उभी असेलेली
मुलगी लग्नानंतर देखी त्याच अॅटिट्यूड मध्ये कामावर जाताना पहायला मिळते ? आज
माझ्या अनेक मैत्रिणींची लग्न झाली आहेत पण लग्नाआधी कामाला असणाऱ्या मात्र आज घरी
बसलेल्या पाहायला मिळतात. मग वाटत ही तीच का ती जी लग्नाआधी महत्त्वाकांक्षी
होती...हिला अचानक काय झालं.. संसार म्हणजे असा नक्की काय आहे कि ज्यामध्ये ही
आपली स्वप्न विसरली ? असे एका न अनेक प्रश्न माझ्या समोर येतात. ही झाली
महत्त्वाकांक्षी असून घरी बसणाऱ्या मुलींची कथा.यांना घरी सासूची माया मिळते
म्हणजेच माझी सासू माझे इतके लाड करते कि बाहेर जवसाच वाटत नाही आणि नवरा काय हव
ते मला आणून देतो त्यामुळे बाहेर जाऊन काही काम करायची गरजच पडत नाही हे असे बोलून
यांनी स्वतःच स्वतःला त्या कोशात ठेवलेले असते. आता येतात स्वतःच्या पायावर उभ्या
असलेल्या आणि लग्नानंतर देखील तशाच ठामपणे उभ्या असणाऱ्या मुली. यांच्या लग्नाच्या
आधीची परिस्थिती आणि लग्नानंतर ची परिस्थिती खर तर मला खूप हसू येत (हसू नये कारण
त्या स्ट्रगल करत असतात पण मी निर्लज्ज ) तर हसायला यासाठी येत कि लग्नाआधी ‘आम्हाला
अगदी अशीच मुलगी सून म्हणून हवी होती हो असे लाडात म्हणणाऱ्या सासूबाईंचा सूर ‘काय
हे घरात लक्ष पण देत नाही, काय आम्ही संसार-मुलं सांभाळून काम केली नाहीत का ?’
इथपर्यंत आलेला असतो . मग यामध्ये फरफट होते ती स्वतःच्या पायावर असलेल्या
मुलीचीच. एकूणच काय “ करे भी तो क्या करे?”.
आता
एवढं लग्नाचं आल्हाददायक वातावरण
आजूबाजूला असताना वयाची चाळीशी झाली आणि लग्न नाही झालं तरीही तसूभरही वाईट वाटणार नाही या पायरीवर मी आहे. अर्थात हे माझे
वैयक्तिक मत आहे बाकी आहेच “अपनी अपनी सोच”.


True💯 jaisi jisaki soch...#suno_dil_ki😇
ReplyDeleteTrue 💯
ReplyDeleteSo true suitations
ReplyDeleteRelatable
ReplyDelete