निराशेचे ते दिवस
निराशेचे ते दिवस
बदल हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात...ते कधी चांगले कधी वाईट आशा स्वरूपाचे असतात.हेच बदल गेल्या काही महिन्यांपासून माझ्यामध्ये घडून येत होते..आणि हे बदल माझ्यामध्ये घडतायत हे मात्र जाणवलं नाही मला कधी.कदाचित मानासशत्र शिकून सुद्धा नेमका तोच topic शिकायचं राहून गेला किंवा bunk तरी मारला अस वाटायला लागलं. हळू हळू जेव्हा या संबंधी मी काही लोकांशी बोलले तेव्हा तो miss झालेला topic म्हणजे "नैराश्य" म्हणजेच depreeshion हा होता.आता या वयात कसलं आलाय depreeshion असे अनेक प्रश्न विचारले गेले. तर हे सांगावस वाटत की depreeshion मध्ये जायला कोणत्याही वयाची अट नसते.आणि तस बघायला गेलं तर आजच्या जगात अगदी पाच सहा वर्षाच्या मुलाला depreshion येणं हे काही वावग ठरायला नको.कारण बदलती जीवनपद्धती ,पालकांचा मुलांवर वाफहणार दबाव ,स्वतःच स्वतःला घालून दिलेल्या अपेक्षा आणि त्यातून होणारे अपेक्षाभंग अशी विविध कारण या मागे असू शकतात. असो नेमकं तेच झालं माझ्याबाबतीत...
तसं बघायला गेलं तर मी छोट्या शहरातून मोठ्या शहरात आलेली मुलगी. कोकण म्हणजे निवांतपणा हे मुंबई मध्ये आल्यावर प्रकर्षाने जाणवलं. पण सुरवात खूपच चांगली झाली होती. माझ्या आयुष्यात असणार प्रेम . मिळालेले मित्रमैत्रिणी ,माझी roommate ,त्यानंतर मिळालेला जॉब या सगळ्यामुळे सगळंच खूप छान चालला होत. पण हळू हळू रस कमी होऊ लागला सगळ्यातला जॉब सोडला अभ्यासाच्या कारणाने. म्हंटल चला आता नीट अभ्यास पूर्ण करू. पण एकंदरीत सारंच काही संपतय अस वाटायला लागलं..मनात भीती निर्माण झाली एकटेपणाची .खरंतर कोणी लांब गेलं नव्हतं पण मीच लांब करत होते सगळ्यांना. वाढलेली झोप त्यातून येणारा आळस ,जवळ जवळ 24 तासातले मी फक्त 6 ते 7 तास जागी असायचे.काहीही खायची इच्छा व्हायची नाही. कोणाशी बोलावसं वाटायचं नाही. मी कोणासमोर गेले तर माझ्या प्रचंड सुटलेल्या तब्येतीकडे बघून लोक हसतील या विचाराने मी बाहेर जाण लोकांना भेटणं टाळत राहिले(आणि खरच या काळात माझ्या वजनात विक्रमी वाढ झाली).उगाचच जुन्या गोष्टी आठवून रडत बसणे आयुष्य एकदम भकास झाल्यासारखं वाटत होतं. दिवाळीला मस्त मस्त कपड्यांची खरेदी करणारी मी या वेळी मात्र जुने कपडे घालून खुश होते. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा पराक्रम केला तो म्हणजे आत्महत्येचा . खरंतर हा मार्ग फार चुकीचा होता पण मला तो निवडावासा वाटला(sorry Aai baba) आणि थोडं भानावर आल्यानंतर कळलं की आपण किती चुकीचं करायला जाणार होतो.
त्यावेळी मला समजून घेतलं ते माझ्या भावाने. तो सुरवातीपासून सांगत आलेला छकु तू depressshion मध्ये आहेस पण मी पण म्हणत गेले की मला कसलं आलय डिप्रेशन अस म्हणून मी हसून सोडून द्यायचे. पण हळू हळू सगळं गंभीर होत गेल्यावर मला कळलं की हे तेच आहे.
दिवाळीत घरी जाऊन आल्यावर आणि डॉक्टर ला भेटल्यावर थोडं मन हलकं झालय. पण मनाच्या कोपऱ्यात अजूनही त्या नको असणाऱ्या गोष्टी घर करुन आहेत पण मी यातून बाहेर यायचं ठरवलंय. आणि मी यातून बाहेर पडणार आणि नव्या जोमाने आयुष्य जगायला सुरुवात करणार.
यातून एक गोष्ट मला कळली की माणसाने दुसऱ्यावर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि स्वतःला कधीही कमी लेखता कामा नये.कारण जर ही अशी स्थिती आली तर अन्य कोणाचीही मदत आपल्याला मिळत नाही यातून आपणच आपल्याला बाहेर काढायचे असते त्यामुळे Be You... and Love Yourself...

Comments
Post a Comment